Friday, November 12, 2010

Missing the Man...

Its been a year on 11th November since we lost our friend.
The below post was read at his anniversary at Aurgangabad. Just to remind the man, and the moments....

May God rest him in peace.

अधुरे राहीले शोध...

नवीनशी झालेल्या पहिल्या ओळखीपासूनच, मी त्यांना एक शिस्तशीर, कर्तृत्ववान मित्र म्हणून ओळखायचो. सुरुवातीला जेंव्हा आमचा कॉलेजमधे ग्रुप जमला, तेंव्हा मी नवीनयांच्या हजरजबाबिपणा व हुशारीमुळे त्यांचा हेवा करायचो, त्यांच्यापासून दूर राहायचो, जेणेकरून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे होणारी माझी स्पर्धा टळावी.

परंतु हळूहळू परिस्थिती बदलली. IIT मुंबईच्या प्रदर्शनाला पाहण्यासाठी पहिल्यांदा मी नवीनच्या ग्रुपमध्ये सामील झालो. मुंबई फिरलो. त्यावेळेस विविध प्रकारे मला व सार्‍या ग्रुपला त्यांच्या विविध गुणांची माहिती झाली. त्यांचा वक्तशीरपणा, त्वरित व योग्य निर्णयक्षमता आमच्या लक्षात आली. माझ्या डोक्यावरून जाणारे IIT प्रदर्शनातील प्रॉजेक्ट्स स्वत: आकलन करून नवीन मला समजावायचे. तिथुनच पुढे रोबोटिक्स या विषयावर प्रोजेक्ट करायचा निर्णय त्यांनी घेतला. आयुष्यात रोबोटिक्स इंजिनियर होण्याचे त्यांचे ध्येय होते.
 
या आधीचा नवीनयांचा प्रवास विविधतापूर्ण होता. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९८४ रोजी औरंगाबाद येथे विपीनचंद्र व छाया मंत्री या दांपत्यास झाला. नमिता व अमिता दीदीनी त्यांचे प्रेमाने संगोपन केले. सावंतवाडी, नासिक, अमरावती, पुणे ई. विविध शहरांमधे त्यांचे शिक्षण झाले.

नासिक येथील के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी आय.टी. या शाखेत पदवी घेतली.
त्यांना फोटोग्राफी, गिर्यारोहण तसेच प्रवास हे विशेष छंद होते. तसेच ते महाविद्यालयातील नृत्य आदि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असत. विविध इलेक्ट्रॉनिक्स ग्याझेटस वापरण्याची तसेच डिजिट, पीसी क्वेस्ट आदी कॉम्प्यूटर मासिके वाचण्याची त्यांना आवड होती. रोबोटिक्स इंजिनियर होण्याच्या दृष्टीने त्यानी शालेय जीवनापासूनच प्रयत्न सुरू केले. अभ्यासक्रमातील इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक्स आदी विषयांबाबत त्यांना विशेष रुची होती.

तृतीय वर्ष अभियांत्रिकी मध्ये आम्हाला काँप्युटर DOS सिस्टिममध्ये पेंट सॉफ्टवेअर बनविण्याचा प्रोजेक्ट होतावर्गातील  सर्व  मित्रांनी  आपापल्या  क्षमतेप्रमाणे प्रोजेक्ट तयार केलेपरंतु  नवीन  यांनी  माऊस  कर्सर  तयार  करणे, प्रिंटिंग आदी  कठीण  सुविधाही  त्या  प्रोजेक्टला  पुरवल्या  होत्यात्यांचा तो प्रोजेक्ट नक्कीच वाखाणण्याजोगा होता.

त्याच वर्षी नवीन यांनी त्यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट TCS-Total Communication System वर काम सुरू केलेअंध व्यक्तींना सुलभतेने काँप्युटर टाइपिंग  वाचन करता यावे या उद्देशाने प्रेरित झालेला हा प्रोजेक्ट होता

अंध व्यक्तींना लिहीण्या-वाचण्यासाठी 'ब्रेल' या लिपीचा वापर होतो. याच लिपीतील अक्षरांना काँप्युटर कि-बोर्डशी संलग्न करून नवीन यांनी एक विशिष्ट कि-बोर्डची रचना केली. तो कि-बोर्ड त्यांनी स्वत: ब्रेल लिपीचा अभ्यास करून  बनविला. तसेच काँप्युटर स्क्रीन वरुन अक्षरे वाचता यावीत यासाठीही या कि-बोर्ड सारखे 'ब्रेल-रीडर' तयार केले. ज्यांनी हा प्रोजेक्ट पाहिला त्यांनी नवीन यांच्या प्रयत्नांना दाद दिली.

हा प्रोजेक्ट नवीन यांनी अनेक यूनिवर्सिटीत सादर केला. परुळ यूनिवर्सिटी, बरोडा; कामिन्स वुमेन्स महाविद्यालय, पुणे; के.के.वाघ महाविद्यालय, नासिक तसेच शेगाव महाविद्यालय येथे या प्रोजेक्टला प्रथम क्रमांक मिळाला.
पुढे या प्रोजेक्टला पेटंट करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले.

नागपूर येथे Y.C.C.E. अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन आणि मी वेब-डिझायनिंग स्पर्धेत सहभाग घेतला. आमच्या के.के.वाघ महाविद्यालयाची वेबसाइट अभिनव पध्दतीने सादर करून आम्ही स्पर्धेत उतरलो. आमच्या वेबसाइटला प्रथम पारितोषिक मिळाले. त्यामुळेच आम्ही पुढे आमच्या I.T. डिपार्टमेंटची वेबसाइट बनविण्याची जबाबदारी स्वीकारली.

महाविद्यालयातील अनेक कार्यक्रम करण्यासाठी मला नवीनच्या कल्पकतेची व विविध कौशल्यांची विशेष मदत झाली.

अंतिम वर्षाच्या प्रोजेक्ट साठी नवीनने आमचा मित्र सुमित सोबत 'रिमोट सोल्जर्स' हा प्रोजेक्ट बनविला. विविध अल्गोरीदम्स वापरून  प्रोग्राम केलेला रोबोट या प्रयोगाद्वारे बनविण्याचा प्रयत्न होता. हा रोबोट आपल्या मार्गात येणारे अडथळे ओळखून मार्गक्रमण करू शकतो, हेच या प्रयोगाद्वारे सिद्ध करायचे होते. पुढे संरक्षण क्षेत्रात या प्रोजेक्टचा उपयोग करण्याची त्यांची इच्छा होती.

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होण्याआधीच नासिकच्या 'सारडा'ग्रूप ने नवीन यांना कॅंपस इंटरव्यू मार्फत नोकरी ऑफर केली. नवीन यांनी पुढे जुलै २००६ ते डिसेंबर२००६ या कालावधीत येथे पर्चेस इंजिनियर या पदावर नोकरी केली. या दरम्यान सारडा ग्रूपचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट (सोलार पॅनेल चा वापर करून सोलार भट्टी बनवणे) यात त्यांनी विशेष संशोधन केले.

नवीन यांची नोकरी व्यवस्थित चालली होती, परंतू कुठेतरी एक घुसमट कायम होती. रोबोटिक्स इंजिनियर बनण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. शेवटी त्यांनी पदाचा राजीनामा देऊन पुणे येथे CDAC इन्स्टिट्यूटमधे एंबेडेड सिस्टम्स मधे शिक्षण घेण्याचा धाडसी निर्णय घेतला.

शिक्षण पूर्ण होताच डिसेंबर २००७ मधे बंगळूरयेथील ABB या आंतरराष्ट्रीय कंपनीने रोबोटिक्स इंजिनियर या पदावर नवीन यांना नोकरीची ऑफर दिली. नवीन यांनी ती स्वीकारली. थोड्याच दिवसात त्यांची प्रगती पाहून कंपनीने त्यांना नव्या प्रोजेक्ट साठी स्वीडन येथे पाठवले.

आपले ट्रेनिंग पूर्ण करून नवीन यांनी तो प्रोजेक्ट यशस्वीरित्या बंगळूर येथे पूर्ण केला.

एक विद्यार्थी ते यशस्वी रोबोटिक्स इंजिनियर हा प्रवास नवीन यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. परंतू जीवनात घडलेल्या अतिशय दुर्दैवी घडामोडींनंतर नवीन यांच्यावर अपघाताने अतिशय क्रूर झडप घातली. त्या घटना, तो काळ, आम्हासाठी अतिशय दुर्दैवी ठरला. आम्ही एक जिवलग गमावला. परंतू त्यासोबतच अनेक कल्पना, प्रयोग, शोध अपूर्ण राहीले व ते आपण सर्वांनी गमावले.

ईश्वर स्व.नवीनचंद्र मंत्री यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.

- स्व.नवीनचंद्र मंत्री  मित्र परिवार

Tuesday, November 17, 2009

Navin was just starting with a Software Company...

Visit this link: http://www.venkateshgroup.com/aboutus.html
Navin's first site by profession. He was about to start his own company for software and wesite making.
He has placed his ad on the page.
Many things left uncomplete....
================================================================






NavSurya Software Company


..............................................................................................................

  • Custom software systems and database design:

We design and construct softwares from simple bill printing till complex inventory managment programs.

As as per requirement of client.

  • Web design and web development:

These high performance websites have standard features that other web development companies do not even discuss with you, let alone provide as standard features like:

Beautiful aesthetic website designed by professionals

Thursday, November 12, 2009

My most precious moments with Navin

I remember when I first interacted with Navin it was in second year of engineering and the first thing i loved about him was his exuding confidence and an extraordinary positive outlook towards life. He had 3 ATKT at that point of time and was on the verge of year down but it was his confidence which made me said to him for the very first time "Of all the people I consider you to be the least of all to have a drop". And indeed he made it through. His roommate "Bhan" used to tell me that when Navin was appearing for backlog exams more than Navin himself it was Bhan who was tensed. Reason being, Navin was always aware about his strengths and weaknesses and he knew how to capitalize each well. Unfortunately people around him used to undermine him, so when he used to play games at the time of exams people used to think he is just wasting his time and on the contrary he was relaxing himself.
Our real bond started when I moved in to hostel and we became next door neighbors. At that point of time I really came to know about his little eccentricities which made him stood apart. His legendary breaking of grill with a deo spray, igniting his room with totally non-inflammable material, his die hard love of electronics and plenty of other cool stuff which really made him stand out. It was at this point of time I realized his hidden potential. The two years I spent with him at hostel were totally memorable. Be it the exam days, our lassi making time, AOE and NFS competitions, our fights on some trifle issues, Holi days when we used to drink bhang n enjoy ourselves n numerous other things. I remember one fine night where both of us were getting bored so we started watching movies. We watched one move, then another n then another. We checked the time it was 3 a.m. Then we decided to watch one more movie n then go to sleep. The movie we started was "City of Angels". That movie inspired us so much that we changed our clothes and went to Pandavlena just to see sunrise. Crazy stuff but we loved it... Navin and I also had our training together. I was going through a very rough patch at that point of time but he was intelligent enough to take care of me in his own special way. He was not a guy who was quiet expressive but his actions were loud enough for us to understand. I can just go on and on about that. I have lost one of my biggest confidantes in him. Navin was not just by name Navin but also in his approach and various ideas coming out from his 44oV brain circuit. We'll miss you Navin may you rest in peace.

We Lost the New Moon Minister...




It was the gloomy noon of 11th November 2009, nearly 1.30PM in Aurangabad when the time caught our beloved Navin Chandra Mantri...
He was hit by a private school bus at crossing and that cost us to loose our loving friend.
It left many Questions, un answered.

He always wanted to be a perfectionist... he lived like a royal man....
Many of us know that he suffered many debacles in the year 2009. His personal life suffered badly due to consequent calamities and still he was standing tall, facing all with smile on his face.

I remember the time, when I met him in the bad days...
We remember the time, when we were together....
Lets Share... and re-create the memories....
He will be always with us.